Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात
Sanjay Shirsat | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशात अजित पवारांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलं होत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलत असताना शिरसाट यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र चालवलं आहे.
Ajit Pawar showed your place
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “अजित पवारांनी तुम्हाला एक खुट्टी काय ठोकली तुमची भाषा बदलली. तुम्हाला ज्या प्रकारची भाषा समजते, त्याच भाषेत अजित पवारांनी बरोबर तुम्हाला समजून सांगितलं आहे. अजित पवारांनी तुम्हाला तुमची लायकी दाखवल्यानंतर तुम्ही तुमचं स्टेटमेंट बदललं आहे.
पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत यांनी हे सर्व स्वतः स्वतःवर ओढवून घेतलं आहे. कारण तुम्हीच म्हणाले होते ज्याचं जळतं त्यालाच कळतं. सध्या तुमची जळून राख झालेली आहे. त्यामुळे आता तरी सुधारा.”
दरम्यान, संजय राऊत यांच्यामुळे महाविकास आघाडी तुटणार का? असा प्रश्न अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत अजित पवार म्हणाले, “जोपर्यंत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा एकोपा आहे, तोपर्यंत मविआला काहीही होणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- Odisha Train Accident | रेल्वेच्या भयानक अपघातात आईच्या प्रसंगावधनानं वाचवला कुटुंबाचा जीव
- Ajit Pawar | “…तर कानाखाली आवाज काढलं”; भर बैठकीत अजित पवार संतप्त
- WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत भर! संघातील ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखाप्रतग्रस्त
- Cabinet Expansion | शिवसेना वर्धापन दिनाच्या आधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?
- Petrol Price | आनंदाची बातमी! जूनच्या सुरुवातीलाच ‘या’ शहरातील पेट्रोल दर झाले स्वस्त
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IVXw1P
Comments are closed.