Sanjay Shirsat | आदित्य ठाकरेंनी मोर्चा काढणे म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गट 01 जुलै रोजी मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चावरून शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे फिरून मातोश्रीवरच येणार आहे. मोर्चा कुठून कसा जाणार हे त्यांना माहित नाही, असं संजय शिरसाट म्हणाले आहे.

आदित्य ठाकरे यांच्या मोर्चावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “गेली 25 वर्षे यांनी भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा मोर्चा फिरून मातोश्रीवरच येणार. आदित्य ठाकरे पाळण्यात होते तेव्हापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हातात मुंबई महानगरपालिका होती. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी एकदा बाबांना जाऊन विचारायला हवं की, आपल्या हातात किती वर्ष सत्ता होती? बाबा आपण काय दिवे लावले आहे? मुंबईत इतके खड्डे कसे काय? बाबा आपल्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये का राहावं लागतं?”

Aditya Thackeray is not bigger than the law – Sanjay Shirsat

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी मोर्चा काढणं म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड आहे. कायद्यापेक्षा आदित्य ठाकरे मोठे नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे असो की अजून कोणी जो भ्रष्टाचार करेल तो जेलमध्ये जाईल. ”

“चोर मचाये शोर’ हे बरोबर ठाकरे गटाला लागू होतं. आम्हाला त्यांनी केलेला भ्रष्टाचार समोर आणायचा आहे. त्यांचे एक-एक मासे आता गळाला लागत असल्यामुळे त्यांची फडफड सुरू झाली आहे”, असेही ते (Sanjay Shirsat) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3rfHGZS

You might also like

Comments are closed.