Sanjay Shirsat | “आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी, ते औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन..”

Sanjay Shirsat | मुंबई : राज्य सरकारच्या औरंगाबाद शहराचं नामांतर ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याच्या या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यातच एमआयएमने या नामांतरास विरोध दर्शवला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी विरोध करत राहण्याची भूमिका घेतली आहे. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खासदार जलील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Shirsat Criticize Imtiyaz Jaleel

“आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना हे नाव आवडणार नाही. त्यांचं म्हणणं त्यांच्या पद्धतीने ठीक आहे. त्यांना राजकारण त्यांच्या पद्धतीने करायचं आहे. ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांचे हाल केले. त्या औरंगजेबाचं नाव काढून संभाजी महाराजांचं नाव शहराला देताना यांना का त्रास होतो? तुम्ही औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकवतात. आम्ही तुम्हाला विरोध नाही केला”, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“औरंगजेबाचा एवढा पुळका असण्याचं कारण काय?”

“तुम्ही तुमचं राजकारण करा. परंतु औरंगजेबाबद्दल एवढा तुम्हाला पुळका असण्याचं कारण काय? मग आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवा. राजकारण हे प्रत्येक गोष्टीत नसतं. महापुरुषांचा अभिमान जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, तर आमचं काय चुकलं? आम्ही दिलेल्या नावाला तुमचा विरोध असण्याचं कारण काय? त्यांना त्यांचं राजकारण करायचं आहे, त्यांना त्यांची मुघलशाही, निजामशाही, औरंगाबाद, निजामाबाद, उस्मानाबाद ही त्यांची ओळख आम्हाला कशाला पाहिजे”, असेही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

नामांतराला इम्तियाज जलील यांचा विरोध

“महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केलं नाही. हे लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी असं करत आले आहेत. आम्ही नावाचा विरोध केलेल आहे, करत राहणार आहे. कारण, जेव्हा सरकार म्हणून चांगलं काही केलं आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे काही नसतं, तर मग अशाप्रकारचे मुद्दे ते वारंवार पुढे आणतात”, असे इम्तियाज जलील म्हणाले आहेत.

“भावनिक मुद्य्यांमध्ये कसं अडकवण्याचा प्रयत्न केला जातो, हे याचं एक प्रमुख उदाहरण आहे. त्यांच्याकडे संख्याबळ आहे, सरकार त्यांचं आहे. उद्या ते कायदा आणू शकता की आमचं नाव बदलायचं आहे. पण घटनेने मलाही एक अधिकार दिलेला आहे. त्यानुसार मी विरोध करणार आहे. ” असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.