Sanjay Shirsat | ईडीचं नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न – संजय शिरसाट

Sanjay Shirsat  | मुंबई : 11 मे ला  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीचे (ED) नोटीस आले होते. त्यानंतर त्यांनी चौकशीसाठी हजर न  राहण्याबाबत ईडीला विनंती पत्र दिलं होतं. तर आज ( 22 मे) जयंत पाटील यांनी  मुंबईच्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली आहे. त्यांच्या या इडी चौकशीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ( NCP) काही ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. तर जयंत पाटील ( Jayant Patil) यांच्या ईडी चौकशीवरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया  येत आहेत. यामध्ये शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

jayant Patil Ed Enquiry Ncp Protest

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पत्रकार परिषदेत घेत अनेक गोष्टीवर भाष्य केलं. त्यामध्ये त्यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधत म्हटलं की, “एखाद्याला ईडीचं (Ed) नोटीस आल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीन पॅटर्न महाराष्ट्रात तयार झाला आहे”. त्यामुळे आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं चुकीचे आहे. ईडीची (ED) नोटीस आली म्हणजे ताबडतोब शिक्षा होणार असं काही नसतं. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे जर दिली तर कारवाई करायची की नाही हे ईडी ठरवेल. पण ईडी, सीबीआय (CBI)  यांचा वापर राजकीय लोक करत असल्याचा काही लोकांचा गैरसमज झाल आहे. अशा शब्दांत शिरसाट ( Sanjay Shirsat) यांनी जयंत पाटलांवर (Jayant Patil) निशाणा साधला आहे.

Sanjay Shirsat Commented On jayant Patil

दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) यांना आयएल आणि एफएस प्रकरणी  ईडीकडून नोटीस पाठविण्यात आलं होत. कारण आयएफ आणि एफएस या कंपनीच्या व्यवहाराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती त्यानंतर त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार या कंपनीच्या माध्यमातून झाला असल्याचा आरोप करण्यात आला.  यामध्ये आर्थिक व्यवहारात अनियमितता होती. तसचं मनी लॉंडिंग झालं असल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. तर चौकशी दरम्यान अनेक नावे समोर आली होती. यामध्ये जयंत पाटील (Jayant Patil) याचं देखील नाव आहे.  त्यानंतर आता जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस बजावलं असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IwaJye