Sanjay Shirsat | “नसबंदी झाल्यानंतर मुलं होत नाही, मात्र संजय राऊतांना…”; संजय शिरसाटांची राऊतांवर खोचक टीका

Sanjay Shirsat | मुंबई: राज्यातील राजकारणात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊत यांच्या टिकेला उत्तर देत संजय शिरसाट यांनी राऊतांवर जहर टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे राजकारणातला प्रेम चोपडा आहे, असा टोला शिरसाटांनी राऊतांना लगावला आहे.

Sanjay Shirsat criticizes Sanjay Raut

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत राजकारणातला प्रेम चोपडा आहे. दररोज काही ना काही बडबड करून कुणाला नांदू द्यायचं नाही, असा त्यांचा हट्ट असतो. ज्यांची नसबंदी झालेली असते, त्यांना मुलं होत नाही असं म्हणतात. मात्र, संजय राऊत असा चमत्कार आहे. जो नसबंदी झाल्यावर ही आम्हाला मुलं होतील असं सांगतो.

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “18 खासदारांपैकी 13 खासदार निघून गेले आहे. तरी संजय राऊत 19 खासदार असल्याचा दावा करतात. हे मूर्खपणाचे लक्षण आहे. हा मूर्खपणा संजय राऊत करत आहे.”

What did Sanjay Raut say?

माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिंदे गट हा कोणताही पक्ष नाही. भाजपने पाळलेला तो एक कोंबड्यांचा खुराडा आहे. भाजप या कोंबड्या कधीही कापू शकतो. पक्ष म्हणून शिंदे गटाकडे कोणतीही विचारधारा नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3IHj0Q8

You might also like

Comments are closed.