Sanjay Shirsat | “बांगर एक चांगले आमदार, पण…”; गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
Sanjay Shirsat | मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी एका प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत 30 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
‘एका शिक्षकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. ते कुणालातरी मारहाण करतात. हे पक्षाच्या प्रतिमेला मलिन करणारे नाही का?’ या प्रश्नावर संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय बांगर हा एक चांगला आमदार आहे. पण, काही गोष्टी त्यांच्या मनाला खटकतात. म्हणून तो भावनावश होतो”, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
“मागल्या वेळी एक घटना घडली. आता हे दुसरं प्रकरण आहे. या प्रकरणी नेमकं काय घडलं याची मलाही पूर्ण माहिती नाही. परंतु, कोणत्याही आमदारानं हात उचलताना काळजी घेतली पाहिजे. आपली प्रतिमा मलिन होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मारहाण करणं हे कुणालाही योग्य वाटतं नाही”, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
“खिचडीचं प्रकरण, फोनवरून दमदाटी देणं, अशी काही संतोष बांगर यांच्याविरोधात प्रकरण आहेत. याची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असेल. त्यांना त्याबद्दल समज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देतील. संतोष बांगर हे माझे सहकारी आहेत. त्यामुळं त्यांच्याबद्दल वक्तव्य करणं योग्य नाही”, असे संजय शिरसाट यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Santosh Bangar | संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ; प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
- Nilesh Rane | “पवार साहेब असे एकमेव व्यक्तिमत्व…”; भाजप नेत्याची पवारांवर बोचरी टीका
- Sadabhau Khot | “..पण महात्मा गांधींच्या विचारांचा खून पंडित नेहरुंनी केला”; सदाभाऊ खोत यांचे वादग्रस्त वक्तव्य
- Sudhir Mungantiwar | “जय श्री राम म्हटलं की, राक्षस…”; सुधीर मुनगंटीवारांनी अमोल मिटकरींना डिवचलं
- Shivsena | “प्रकाश आंबेडकरांनी राऊतांची लायकी काढली”; शिंदे गटाच्या आमदाराची जहरी टीका
Comments are closed.