Sanjay Shirsat | “… म्हणून उद्धव ठाकरेंची सुरक्षा काढण्यात आली”; संजय शिरसाटांचा खुलासा

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मातोश्रीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली होती. ही सगळी लोकं शिवसेनेतून मोठी झाली आणि आज हीच लोकं शिवसेनेवर थुंकण्याचं काम करत आहे, असं अंबादास दानवे म्हणाले होते. अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे.

संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “सुरक्षा पुरवण्याचं काम डायरेक्ट सरकार करत नाही. यासाठी गृहखात्याची एक कमिटी असते. या कमिटीकडे जो अहवाल येतो, त्यानुसार सुरक्षा प्रदान केली जाते आणि हे सर्व अंबादास दानवे यांना देखील माहित असेल.

Balasaheb Thackeray had tight security till the end – Sanjay Shirsat 

पुढे बोलताना ते (Sanjay Shirsat) म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अखेरपर्यंत मोठी सुरक्षा होती. मातोश्रीची सुरक्षा काढण्यात आली असेल तर हा सर्वस्व कमिटीचा निर्णय असेल. त्यामुळे त्यामध्ये आपण हस्तक्षेप करू नये. राजकीय हेतूने कुणाची सुरक्षा काढून घेणे आमचं काम नाही.”

दरम्यान, माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) त्यांनी सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला होता. “मातोश्रीची सिक्युरिटी कमी करणे, ठाकरे कुटुंबाची सिक्युरिटी करणे या सगळ्यांमध्ये सरकारचा वेळ चालला आहे. हे सरकार सुडाचं राजकारण करत आहे. या सर्व गोष्टींमुळे आम्ही माघार घेऊ, असं त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/sanjay-shirsat-reaction-to-the-removal-of-uddhav-thackeray-security/?feed_id=45609