Sanjay Shirsat | मुंबई : 2 मे पासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी आपल्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या सोहळ्यादरम्यान अध्यक्षपदावरून निवृत्ती घेणार असल्याची जाहीर केलं होतं. त्यावरून सत्ताधारी पक्षाकडून देखील प्रतिक्रिया येत होत्या. नक्की राजीनामा देऊन शरद पवारांची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आणि पक्षातील अंतर्गत वादासाठी काय राजकीय खेळी असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर काल (5 मे) पवारांनी आपला राजीनाम्याची निर्णय माघारी घेतला आहे. त्यावरून आता शिवसेना (शिंदे गटा)चे नेते आमदार संजय शिरसाट( Sanjay Shirsat) यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावरही खोचक टीका केली आहे.
पवारसाहेबांनी राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला : संजय शिरसाट
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले की, सर्वांनीच गेल्या 3ते4 दिवसांमध्ये बघितलं असेल जे काही शरद पवारांचं राजीनामा नाट्य चालू होतं. त्यामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. पवारांनी जी काही पक्षामध्ये कुजबुज, चर्चा, नाराजी, कोणीतरी बंड करणार असल्याची चर्चा सुरू होती अशा अनेकांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला आहे. असं शिरसाट म्हणाले . तसचं जेव्हा हे नाट्य सुरू होत तेव्हा तुम्ही निरीक्षण केलं की नाही हे माहीत नाही परंतु सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्या चेहऱ्यावर या निर्णयावरून काहीच तणाव वाटत नव्हता. यामुळे थोडी का असेल शंका होतीच की, काहीतरी राजकीय खेळ पवार करणार असं देखील शिरसाट म्हणाले.
(Pawarsaheb did a correct program in resignation drama: Sanjay Shirsat )
दरम्यान, शरद पवारांनी अनेक वेळा राजकीय चाली खेळत राजकीय डाव जिंकले आहेत. तसचं त्यांनी दाखवून दिलं की पक्षातील कोणीही हिंमत केली तर मी माझी ताकत दावेल. याचप्रमाणे अजित पवारांना देखील खोचक टोला लगावत म्हटलं की, आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता त्यांच्याकडे शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे. नक्कीच राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल.अशा शब्दांत टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Jitendra Awhad | शरद पवारांनी राजीनामा माघारी घेतल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया ; म्हणाले …
- Ajit Pawar – अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले जोमाने काम करा
- Sharad Pawar | शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय मागे…पण, अजित पवार कुठे आहेत?
- Sharad Pawar | शरद पवारांचा निर्णय मागे; अध्यक्ष पदावर कायम
- Devendra Fadnavis | मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच : देवेंद्र फडणवीस