Sanjay Shirsat | “राऊत वेडाय माहिती होतं पण वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल वाटलं नव्हतं”; शिरसाट आक्रमक
Sanjay Shirsat | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यावरुन शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
“वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल, हे वाटलं नव्हतं”
‘संजय राऊत वेडा माणूस, त्याची जाणीव मला आहे. त्यामुळेच मी वारंवार त्यांच्या विरोधात बोलत असतो. पण, वेडेपणाची लिमिट क्रॉस करेल, हे वाटलं नव्हतं. 288 सदस्यांना त्यांनी चोर बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार. ही लहान घटना नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली, त्या घटनेच्या आधारे हे विधीमंडळ स्थापन झाले आहे. राज्यातल्या 12 कोटी जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांना त्यांनी चोर म्हटले आहे. यात आदित्य ठाकरेंचाही समावेश आहे.’, असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.
“…म्हणून तो सकाळी भुंकतोय” (Sanjay Shirsat Criticize Sanjay Raut)
“संजय राऊत वेडा आहे म्हणून तो सकाळी भुंकतोय म्हणून आम्ही पाहत होतो पण आज त्याने हाईट केली. राऊत यांनी संपूर्ण 288 आमदारांचा अपमान केला आहे, त्याच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सभागृहात केली आहे” आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.
“सभागृहात कोणीच राऊतांच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही”
“सभागृहात संजय राऊत यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे संजय राऊत चोर म्हणत असताना ते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, आणि छगन भुजबळ या सर्वांना चोर म्हणाले आहे”, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.
“हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं”
“त्यामुळेच सगळ्यांचा रोष त्याच्यावर आहे. सभागृहात एकही सदस्य त्यांच्या बाजूने बोलला नाही. आज तातडीने त्यांच्यावर एआयआर नोंदवला गेला पाहिजे होता आणि अटक झाली पाहिजे होती. आम्ही यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनाही बोललो. त्यांनाही सांगितलं की, यांची पोलीस सुरक्षा काढून घ्या. पोलीस सुरक्षेत हा बडबड करतो आणि स्वतःला शिवसैनिक म्हणतो. हिम्मत असेल तर त्यांनी एकट्याने फिरुन दाखवावं”, असं खुलं आव्हान शिरसाट यांनी राऊतांना दिलं आहे.
दरम्यान, भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या मागणीवरुन संजय राऊत यांचं पोलीस संरक्षण काढून घेतलं जाईल का? संजय राऊतांच्या वक्तव्याची चौकशी केल्यानंतर नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Santosh Bangar | “अशा हराXXX महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही”; संतोष बांगर राऊतांवर आक्रमक
- Devendra Fadnavis | “म्हणजे उद्धव ठाकरे पण चोरमंडळाचे सदस्य”; राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- Sanjay Raut | “विधिमंडळाविषयी माझ्या भावना अत्यंत बहुमोल”; ‘चोरमंडळा’च्या वक्तव्यावर संजय राऊत यांची सारवासारव
- Ajit Pawar | संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे सभागृहात गोंधळ; अजित पवारांचं शेलारांना समर्थन
- Nitesh Rane | “संजय राऊतांचे १० मिनटे पोलीस संरक्षण काढा”; सभागृहात नितेश राणे आक्रमक
Comments are closed.