Sanjay Shirsat | “शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली” : संजय शिरसाट

Sanjay Shirsat | मुंबई : सध्या सत्तासंघर्षाच्या निकलावरून अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील निकाल आमच्याचं बाजूने लागणार अशी प्रतिक्रिया दिली होती. आता संजय शिरसाट यांनी देखील निकाल आमच्याच बाजूने लागणार म्हणत अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. याचप्रमाणे अजित पवारांवर देखील निशाणा साधला आहे.

अजित पवार यांचे इकडचे दरवाजे बंद : संजय शिरसाट

माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार टीका करतात कारण त्याचे इकडचे दरवाजे आता बंद झालेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार साहेबांनी जे काही राजीनामा नाट्य केलं त्यातून पवार साहेबांनी भाकरी न फिरवताच अजित पवारांची जिरवली आहे. यामुळे आता ते रागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत. ते ना इकडचे राहिलेत ना तिकडचे राहिलेत अशी टीका शिरसाट यांनी अजित पवारांवर केली आहे. तसचं आम्ही हवालदार नाही ना इतर काही आम्ही जनतेचे सोपदार आहोत आणि कायम जनतेच्या सोबत राहणार असं देखील शिरसाट म्हणाले.

( Sanjay Shirsat Commented On Ajit Pawar )

दरम्यान, सत्तासंघर्षाचा निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे कारण आम्ही चुकीचं काहीच केलं नाही. या निकालाची भीती आम्हाला नाही त्याची भीती ठाकरे गटाला आहे.असं संजय शिरसाट म्हणाले. तसचं त्यांनी सुषमा अंधारेवर टीका करत म्हटलं की, त्या मोठ्या कलाकार आहे. यामुळे आता शिरसाट यांनी निकालाबाबत आशावाद व्यक्त केलेला पाहायला मिळत आहे. तर संपूर्ण देशाचं लक्ष आता या निकालाकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-