Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…

Sanjay Shirsat | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार पुढच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची यादी तयार असल्याच्या चर्चा देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Sanjay Shirsat Said About The Cabinet Expansion

मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “गेल्या वेळी मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला मंत्रीपद मिळाले नाही. तेव्हा मी निराश झालो होतो. मात्र प्रत्येकजण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा मंत्री होऊ शकत नाही.”

Are you ready to go to Matoshree? Sanjay Shirsat said…

मंत्रीपद मिळाले नाही तर तुम्ही मातोश्रीवर जाण्याचा तयारीत आहात का? या प्रश्नाचे उत्तर देत शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “मातोश्रीवर काही उरले नाही. उलट तिथे असलेले आमदार शिंदे साहेबांच्या फोनची वाट बघत आहे. आम्ही शिंदे साहेबांसोबत आहे. मंत्रीपद मिळो अथवा न मिळो आम्ही सर्व शिंदे साहेबांसोबत कायम राहणार आहोत.”
दरम्यान, शिंदे गट असो किंवा भाजपचे आमदार सर्वजण मंत्रिमंडळ विस्ताराची वाट बघत आहे. रखडेलेला मंत्रिमंडळ विस्तार मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे बोलले जात आहे.

Bacchu Kadu Commented On Cabinet Expansion

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले की, “जेवणाचं आमंत्रण हे जेवण केल्याशिवाय खरं नसतं. घोडामैदान जवळ आहे. जरी मंत्री झालो नसलो तरी काम करतोय. पण मंत्री झालो तर आणखी वेगानं काम करेनं.” अशी मिश्किल टीका बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45mGGmq