Sanjay Shirsat । अजित पवारांच्या मनातले ४ दिवसात कळेल; वज्रमूठ सभेचा जास्त त्रास पवारांना – संजय शिरसाट
Sanjay Shirsat | मुंबई : आज (1मे) ला मुंबईमध्ये वज्रमुठ सभा पार पडणार आहे. या सभेसाठी जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे. तसचं गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या. अनेक राजकीय नेत्यांनी याबाबत भाष्य देखील केली होती. तर आता शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर प्रतिक्रिया देत अजित पवारांबद्दल ( Ajit Pawar) मोठा दावा केला आहे. यामुळे सर्वांचं लक्ष त्याकडे लागलं आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट (What did Sanjay Shirsat say)
आज मुंबईत होणाऱ्या वज्रमुठ सभेपूर्वी संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटल आहे की, अजित पवारहे या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नाहीत कारण त्याच शरीर सभेत असेल पण मन कुठेतरी असेल. यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की, नाही माहित नाही. तर येणाऱ्या चार दिवसांत कळेल त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय? अजित पवार अनेक वेळा अनेक विषय हसून घालवतात पण त्यांच्या मनात काहीतरी आहे. असा दावा शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार भाजपसोबत जाणार का? या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या मुंबईतील वज्रमूठ सभेवरून देखील शिरसाट यांनी महाविकास आघाडी आणि ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. पुढे शिरसाट म्हणाले की, “याआधी सुद्धा बाळासाहेबांच्या काळात त्या मैदानावर सभा झाल्या आहेत. त्या सभांसोबत आजच्या सभेची बरोबरी करता येणार नाही. हे जे तीन पक्ष एकत्र येऊन गर्दी करतायत आणि आम्ही सोबत आहोत असा दिखावा करतात यातून काही सिद्ध होणार नाही. जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी ते म्हणायचे जर गर्दी होते मग मतदान का मिळत नाही?असा त्यांच्या प्रश्न असायचा त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही. कोणाच्या सभेला किती गर्दी झाली त्यावरून महाराष्ट्र कुणाच्या मागे आहे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलते हा समज चुकीचा आहे. असं शिरसाट म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे सर्वांचं लक्ष येत्या चार दिवसात अजित पवार कोणती भूमिका घेणार? की राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार नाही या मतावर ठाम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
- Ajit Pawar । “महाराष्ट्र दिनानिमित्त जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया” : अजित पवार
- NCERT Recruitment | शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषद यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती सुरू
- Job Opportunity | एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | उत्तर भारतात गारपिटीचा इशारा, तर देशात पुढील पाच दिवस वादळी पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती!
- Nitesh Rane – राजकाराणातली गंगुबाई ( संजय राऊत ) खुप बोलली एकले – नितेश राणे
Comments are closed.