Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार
Sanjay Shirsat | मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेने शिंदे गटाला फक्त 48 जागा देण्याचे वक्तव्य बावनकुळे यांनी केले आहे. यावरुन आता भाजप-शिंदे गटात वाद होण्याची शक्यता आहे. यावर आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया येत आहेत. आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना खडेबोल सुनावले आहे.
Sanjay Shirsat replied to Chandrashekhar Bawankule
“चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलंय. बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत. अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे”, असा सल्ला संजय शिरसाट यांनी चंद्रशेखर बावनकुळेंना दिला आहे.
“48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?”
“48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते”, असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
‘आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढणार असून, शिंदे गटाकडे 50 हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे म्हणत शिंदे गटाला 48 जागा देणार आहोत’, असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं.
चंद्रशेखर बावनकळे काय म्हणाले?
“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं. निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असं वक्तव्य नंतर बावनकुळे यांनी केलं.
महत्वाच्या बातम्या-
- Ramdas Kadam | “भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे, राजकारणातून..”; रामदास कदम आक्रमक
- Sanjay Raut | भाजपकडून शिंदे गटाला फक्त 48 जागा, राऊत म्हणाले; “हीच त्यांची लायकी”
- Oily Hair | तेलकट केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
- Pineapple Juice | सकाळी नाश्त्यामध्ये अननसाच्या ज्यूसचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
Comments are closed.