Sanjay Shirsath | तडकाफडकी राजीनामा देणे म्हणजे पक्षात फुट – संजय शिरसाठ

Sanjay Shirsath | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावूक झाले आहे. पवारांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. पवारांच्या या निर्णयानंतर संजय शिरसाठ यांनी अजित पवारांना खोचक टोला मारला आहे.

“बाजी पलटवण्याची ताकत असताना पेज पलटले. अजित पवार यांचा तडकाफडकी निर्णय घेणं पक्षात फूट पडणार आहे.” अशा शब्दांमध्ये संजय शिरसाठ यांनी अजित पवारांवर टीकास्त्र चालवले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (2 मे) पार पडले. या पुस्तकातून शरद पवार यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहे. ते आता कोणतीही निवडणूक लढणार नाही, त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. त्यांच्या या खुलासानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही नवीन समिती अध्यक्ष पदाबाबत पुढे निर्णय घेईल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे. पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या