संज्या तू फटाके खाणारच, पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार !

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याची भाषा केली. त्यानंतर शिवसेना त्यांच्यावर तुटून पडली आहे. कार्यकर्ते-नेते-पदाधिकाऱ्यांनी उत्तरं देऊन झाल्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनीही थपडीची भाषा केली. आता आज सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरपार लढाईची भाषा केली आहे.

शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जाण्याची वेळ येईल, यायचंय तर या मग, असा इशारा शिवसेनेनं प्रसाद लाड आणि नितेश राणे यांना दिला आहे. खरंतर या मंडळींची दखल घ्यावी आणि त्या टिनपाटांवर इथे काही लिहिण्या-बोलण्याची आमची अजिबात इच्छा नाही. पुन्हा हे जे कोणी फोडा- झोडा याची भाषा करीत आहेत त्यांची लायकी फक्त चिंधीचोर दलालांची आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं प्रसाद लाड आणि नितेश राणेंना अग्रलेखातून फटकारलं आहे.

यानंतर आता याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नीलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केलीय. इतकेच नाही तर राणे यांनी सदा सरवणकर यांच्यावरही निशाणा साधलाय. ते म्हणाले की, ‘हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.’

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा