Santosh Bangar | “अशा हराXXX महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही”; संतोष बांगर राऊतांवर आक्रमक

Santosh Bangar | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज कोल्हापुरात एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘राज्यातील विधीमंडळ हे चोरमंडळ आहे’, अशा आशयाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे. राऊतांच्या या वक्तव्यानंतर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकच गदारोळ झाल्याचं पहायला मिळालं आहे.

भाजपच्या सदस्यांनी संजय राऊतांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळाचं आजचं कामकाज तहकूब केलं आहे. सभागृहातील कामकाज तहकूब केल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या सदस्यांनी विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh bangar) यांनी संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत आणि थेट शिवी देत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Santosh Bangar aggressive on Sanjay Raut regarding his statement 

“संजय राऊत आमच्या मतांवर निवडून येतो आणि आम्हालाच चोर म्हणत आहे. मला वाटतं, हा संजय राऊत डाकू आहे डाकू… त्याच्यावर 395 कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा.” अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर संतोष बांगर यांनी गलिच्छ भाषेत संजय राऊतांना शिवीगाळ केली आहे.

“जनता यांना ठेचल्या शिवाय राहणार नाही”

“महाराष्ट्रातील जनतेने 288 आमदारांना निवडून दिले आहे. संजय राऊत यांनी त्यावर बोलत असतांना 288 आमदार चोर असल्याचं म्हणत आहे. त्यात उद्धव ठाकरे येतात, आदित्य ठाकरे येतात आणि संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊतही येतात. नितेश राणे यांनी जसं सांगितलं की 10 मिनटं सुरक्षा बाजूला ठेवा जनता यांना ठेचल्या शिवाय राहणार नाही”,असे संतोष बांगर म्हणाले आहेत.

“त्यांनी माफी मागून जमणार नाही. त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई झालीच पाहिजे”, अशी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. संतोष बांगर यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी करत असताना ठाकरे पितापुत्राला टोला लगावला आहे.

“अशा हराXXX महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही”

“संजय राऊत आम्हाला ज्या पद्धतीने चोर म्हणत आहेत, मग उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी चोर म्हटलं आहे. अशा हराXXX महाराष्ट्रातील जनता फिरू देणार नाही,” असंही संतोष बांगर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.