Santosh Bangar | आमदार संतोष बांगर अडचणीत; मोक्काची कारवाई करण्याची मागणी
Santosh Bangar | पुणे : हिंगोलीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. संतोष बांगर नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे अडचणीत सापडले आहे. आता पुन्हा एकदा एका पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राचार्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
आरपीआयच्या खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. सचिन खरात म्हणाले “शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये ते एका प्राचार्याला मारहाण करत आहे. बांगर विधीमंडळात सदस्य आहे त्यांनी कायद्याचे रक्षण करायला हवे पण रक्षण करणारेच खुलेआम कायदा तोंडात असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी” असे सचिन खरात म्हणाले आहेत.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार चालत असेल तर तात्काळ संतोष बांगर यांच्यावर मोक्का लावून अटक करावी” अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला ही मागणी करत असल्याचेही सचिन खरात म्हणाले आहे.
दरम्यान, संतोष बांगर हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या वादात सापडतात, अधिकाऱ्यांना फोन करून अर्वाच्च भाषा वापरणे. त्यातच आता बांगर यांचा प्राचार्यांना मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि खरात यांनी केलेल्या मागणीवरुन बांगर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करुन त्यांना अटक करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | पुण्यातील पोटनिवडणूक लढवण्याबाबत संजय राऊत म्हणाले, “आम्ही…”
- Devendra Fadnavis | मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याने आमदारांना टेन्शन?
- Chitra Wagh | शिवसेनेनं शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोवर चित्रा वाघ भडकल्या; म्हणाल्या, “घरात बसून चकाट्या पिटणाऱ्यांना…”
- Budget Travel Tips | कमी बजेटमध्ये ट्रिप प्लान करत असाल, तर उत्तराखंडमधील ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Big Breaking | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या
Comments are closed.