Santosh Bangar | संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ; प्राचार्यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Santosh Bangar | हिंगोली : शिंदे गटाचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात असलेले संतोष बांगर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बांगर यांच्यासह 35 ते 40 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका प्राचार्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे  आता संतोष बांगर चांगलेच आक्रमक झाले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर बांगर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

“2 दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मीडिया सातत्याने संतोष बांगरची दादागिरी म्हणत आहे. मात्र तुम्ही तिथे जाऊन दूध का दूध पानी का पानी करून दाखवावे. उपमुख्यामंत्र्यांना मी त्या महिलेची क्लिप ऐकवली त्यानंतर त्यांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली”, असा दावा संतोष बांगर यांनी केला होता.

“प्राध्यापकाला मारहाण केल्याचं प्रकरण 8 दिवसांपूर्वीच असून त्यावेळी ते शिक्षक का समोर आले नाहीत? त्या महिलेने उपमुख्यमंत्र्यांना घडलेला प्रकार सांगितला आहे. महिलांना कुणी अपशब्द वापरल्यास मी असे अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे. चौकशीला समोर जायला तयार आहे”, असेही संतोष बांगर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.