Saroj Ahire | “विधीमंडळाच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना”; सरोज अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन

Saroj Ahire | नागपूर :  विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन कालपासून सुरु झाले आहे. नाशिकच्या (Nashik) देवळाली मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) या चर्चेच्या विषय ठरल्या. कारण अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन त्या अधिवेशनात आल्या. आपल्यासाठी हा सुखदः क्षण असल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले. त्याचबरोबर विधानभवन परिसरात फिडिंग रुम किंवा हिरकणी कक्ष व्हावा, अशी मागणी सरोज अहिरे (Saroj Ahire) यांनी केली होती.

त्यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीमध्ये हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे. आमदार सौ.सरोज अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी, स्तनपान करता यावे याकरिता कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत.

आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे कामकाज केले जात असून याठिकाणी स्वतंत्र खोली, पाळणा, वैद्यकीय सुविधा आहेत. या कक्षासाठी एक डॉक्टर, दोन नर्स अशी व्यवस्था करण्यात आली आहे. अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सौ.सरोज अहिरे यांच्या कर्तृत्व आणि मातृत्वाचा सन्मान करीत काल त्यांचे कौतुक केले होते.

आज हिरकणी कक्षाचे उद्घाटन देखील आमदार सौ.अहिरे यांच्या हस्ते करावे असे मत काल व्यक्त केले होते. त्यानुसार सकाळी या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सोबत आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.