InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पुण्यातील ससून रूग्णालयातील डाॅक्टरला भाजप नगरसेविकेची मारहाण

भाजप नगरसेविका आरती कोंढरे यांनी ससून रूग्णालयातील डाॅक्टरला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री दोनच्या सुमारास घडली. यावर महिला डाॅक्टरने तक्रार दिली असून,  नगरसेविकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला डाॅक्टर वाॅर्डमध्ये रूग्णावर उपचार करत असताना नगरसेविका कोंढरे यांनी तेथे येऊन त्यांच्या बरोबरील रूग्णावर तातडीने उपचार करण्यास सांगितले. यावर डाॅक्टरने त्या रुग्णाच्या डोक्यात टाके घातले असून सी टी स्कॅनसाठी पाठवायचे आहे असे उत्तर दिले. यावर चिडलेल्या नगरसेविकेने तुझी तक्रार वरिष्ठांकडे करते सांगून मोबाईल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी महिला डॉक्टरने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत तुला बघून घेईन अशी धमकी दिली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply