‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेता राजीव पॉल कोरोना पॉसिटीव्ह

मुंबई :  कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने प्रत्येकजण अडचनीत आलेले आहेत. सामान्य लोकांनाच नाहीतर कलाकारांनासुद्धा करोनाने ग्रस्तावले आहे. बॉलीवूड मध्येतर झालाच पण आत्ता हा करोना टीव्ही मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या वेगवेगळ्या कलाकारांनाही सतावत आहे. ससुराल सिमर का या मालिकेतील फेम अभिनेता राजीव पॉलला ही कोरोना झाल्याची माहिती आली आहे.

राजीववर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत अधिक माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. राजीवच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली असून त्यानं चाहत्यांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. राजीवनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन याविषयी माहिती दिली आहे. त्याचा ताप काही कमी झालेला नाही. त्यानंतर त्यानं तातडीन रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. अशा परिस्थितीत बॉलीवूडमधल्या दिग्गज कलावंतांनी चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर न पडण्याचे आव्हाहन केले आहे. याशिवाय कोरोनाच्या काळात प्रशासनाला मदत करण्यासाठीही अनेक कलाकार पुढे आले आहेत. त्यांचेही चाहत्यांनी कौतूक केले आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा