InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

Satara Bus Accident: आंबेनळी घाटात ६०० फूट दरीत बस कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू

महाबळेश्वरला पावसाळी सहलीसाठी निघालेल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी मिनी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात ५०० फूट दरीत बस कोसळल्यानं ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. बसमधील प्रकाश सावंत-देसाई बचावले आहेत. ड्रायव्हरनं केवळ क्षणभरासाठी मागे पाहिलं आणि कुणाला काही कळायच्या आत बस दरीत गेली असे  प्रकाश देसाई यांनी सांगितले.

बसमध्ये सगळेजण एन्जॉय करत होते. चेष्टा-मस्करी करत करत प्रवास सुरू होता. तेव्हा, बस चालकाने सहज मागे बघितलं आणि बस रस्ता सोडून मातीवर गेली. त्यावेळी ड्रायव्हरने ब्रेक लावले, पण मातीवरून घसरत जाऊन बस दरीत कोसळली

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.