उदयनराजे भडकले, म्हणाले पिसाळलेल्या कुत्र्याला आधी आवरा

नीरा देवधर कालव्यावरून साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार आणि यांच्यातला संघर्ष चांगलाच पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी बोलावलेल्या बैठकीतून उदयनराजे तडक बाहेर पडले. पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी रामराजेंना पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिली. तसंच मी काही बांगड्या घातल्या नाही, वयाचा मान ठेवतो नाहीतर वयाचे असते तर जीभ हासडली असती, असा इशाराच त्यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेतून उदयनराजे रागाने बाहेर पडले. नीरा नदीच्या पाण्यावरून उदयनराजे आणि रामराजेंमधील वादानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेले उदयनराजे चर्चेतून बाहेर पडत शरद पवारांचा निर्णय कोणताही असेल तो मला मान्य असल्याचं सांगत आधी पिसाळलेल्यांनी आवरा असेही रामराजेंचे नाव घेता उदयनराजे म्हणाले.

दरम्यान ‘कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करीत आहेत,’ अशी टीका रामराजे यांनी काल केली होती.

मात्र, ही टीका सहन न झाल्याने उदयनराजे समर्थक आणि राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी साताऱा शहरातील पोवईनाका येथे रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला.

महत्त्वाच्या बातम्या 

उदयनराजे भडकले; पवारांची बैठक सोडली अर्ध्यावर

नाईक-निंबाळकर वादाला हिंसक वळण; रामराजेंचा जाळला पुतळा

तांत्रिकासोबत शरीरसंबंधाला नकार दिल्यामुळे पतीने घेतला पत्नीचा जीव 

शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे 

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.