InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

एअर स्ट्राइकनंतर देखील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदचा मदरसा तसाच ?

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारतीय हवाई दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून, बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदची तळ उद्धवस्त केल्याचा दावा केला होता. मात्र आता वृत्तसंस्था राॅयटर्सच्या एका वृत्ताने एअर स्ट्राइकवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. राॅयटर्सने दिलेल्या वृत्तामध्ये बालाकोटमध्ये जेथे एअर स्ट्राइक करण्यात आला होता तेथील नवीन सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत जशीच्या तशी दिसत आहे.

सॅन फ्रान्सिस्कोमधील एका खासगी सॅटलाइटद्वारे हा फोटो 4 मार्चला घेण्यात आला आहे. या फोटोंमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सहा मदरसे आजही बालकोटमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार,बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांचे कोणत्याही प्रकार नुकसान झालेले नाही, हे सॅटेलाईट फोटोंमध्ये दिसत आहे. शिवाय, मदरशांच्या इमारतींशेजारी झाडेझुडपे देखील दिसत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply