InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सतीश वेलणकर यांची भाजपचे नवे संघटन महासचिव म्हणून नियुक्ती

सतीश वेलणकर या मराठमोळ्या चेहऱ्याची भाजपचे नवे संघटन महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांच्या जागी सतीश वेलणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रामलाल यांनी स्वत: आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती अमित शाहांना केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

रामलाल परत संघामध्ये पूर्णवेळ काम करणार आहेत. रामलाल यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघात अखिल भारतीय सहसंपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. आरएसएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल भाजपमध्ये संघटन मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत होते.मात्र आता रामलाल यांच्याजागी सतीश वेलणकर यांना भाजप संघटन महासचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सतील वेलणकर सध्या भाजपमध्ये राष्ट्रीय संयुक्त महासचिव पदी आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply