Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेनी फडणवीसांवर उधळली स्तुती सुमने; विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाषण

Satyajeet Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिला होता. भाजपने पाठिंबा दिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे यांचं विधान परिषदेमध्ये पहिलंच भाषण झालं. राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांनी मुद्दे मांडले.

यावेळी बोलताना सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) कौतुक त्यांनी केले आहे. सत्यजीत तांबेंनी फडणवीसांवर कौतुक केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Satyajeet Tambe talk about Devendra Fadnavis

“माझी निवडणूक कशी झाली सर्वांनी पाहिलं. माझ्या निवडणून येण्याचं सगळं श्रेय माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचं आहे. पण ते होत असतानाच मला निवडणूक लढण्याची परिस्थिती निर्माण झाली त्याचं सगळं श्रेय हे देवेंद्र फडणवीसांना आहे”,  असं सत्यजीत तांबे म्हणाले आहेत.

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंधाच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचं श्रेय सत्यजीत तांबे यांनी वडिलांसोबत देवेंद्र फडणवीसांनाही दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed.