Satyajeet Tambe | “देवेंद्र फडणवीस मला मोठ्या भावासारखे”; सत्यजीत तांबेंचं मोठं वक्तव्य 

Satyajeet Tambe | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. नाशिक काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी सुधीर तांबे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तर उमेदवारी न मिळाल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचं पक्षातून निलंबनही झालं. मात्र सत्यजीत यांनी निवडणुकीच्या काळात मौन बाळगलं होतं. 4 तारखेला सविस्तर प्रतिक्रिया मांडू, असं ते म्हणाले होते.

निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आज काँग्रेस नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या जवळच्या संबंधांवर भाष्य केलं. ते म्हणाले, “खरंतर देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध अतिशय जवळचे संबंध आहेत. त्यांना मी माझ्या मोठ्या भावासारखच मानतो.” यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.

“दिवंगत बंधू राजीव राजळे हे ज्यावेळी २००४ ला पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांनी तरुण आमदारांचा युथ फोरम नावाचा ग्रुप तयार केला होता. त्या ग्रुपमध्ये देवेंद्र फडणवीस सुद्धा तरुण आमदार होते. त्यावेळी मी राजीव यांच्यासोबत कार्यक्रमाला जायचो. तिथे देवेंद्र फडणवीस देखील यायचे. त्यावेळी माझी आणि त्यांची ओळख झाली. त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन मला पहिल्यापासून राहिलं”, असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं.

या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. “नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता”, असा गंभीर आरोप सत्यजीत तांब यांनी केला आहे. “माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही” असा सवाल सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :