InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सावरकरांना विनाविलंब भारतरत्न मिळावा- डॉ. सच्चिदानंद शेवडे

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनाविलंब भारतरत्न मिळावा, अशी मागणी ३१ व्या सावरकर साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष तथा प्रसिद्ध व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी रविवारी केली.

स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ मुंबई यांच्यावतीने के. सी. गांधी ऑडीटोरियममध्ये हे संमेलन झाले.  अध्यक्षस्थानी शेवडे होते,  आमदार नरेंद्र पवार, केडीएमसीच्या महापौर विनीता राणे, माजी आमदार प्रभाकर संत, साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष शंकर गोखले, सुरेश पटवर्धन आदी उपस्थित होते.

प्रमुख ठरावासह पोर्ट ब्लेअरला वीर सावरकरनगर असे नाव द्यावे, सावरकरांचे लंडन येथील निवासस्थान केंद्र व राज्य सरकारने ताब्यात घेऊन तिथे स्मारक निर्माण कराव, आदींसह एकूण सात ठराव मांडले.

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.