मदत म्हणा किंवा पॅकेज म्हणा पण तात्काळ घोषणा करा; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोल्हापूर : अतिवृष्टी व पुराच्या पार्श्वभुमीवर आज राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते कोल्हापुरात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी झाल्यानंतर स्वतंत्र पत्रकार परिषदही घेतली.

दरम्यान, विरोधी पक्षाकडुन सरकारने पॅकेज जाहीर करावं, असं सांगण्यात येत होतं. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. “मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असं पत्रकारांशी संवाद साधत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

त्यावर फडणवीसांनी देखील पलटवार केला. आम्ही मागच्यावेळी पूरग्रस्त भागाचं कर्ज माफ केलं होतं. तसा निर्णय आता घेण्याची आवश्यकता आहे. आमची हरकत नाही. त्यांनी त्याला पॅकेज म्हणावं की मदत म्हणावं हा त्यांचा मुद्दा आहे. फक्त त्याची घोषणा करावी. सामान्य माणसाला मदत करावी, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

यावेळी फडणवीस म्हणाले, नागरिक सातत्याने २०१९च्या मदतीचा उल्लेख करत होते. तेव्हा रोखीनं तात्काळ मदत करण्यात आली होती. नियमित कर्ज भरणाऱ्या पूरग्रस्तांना सरकार ५० हजार देणार होतं, पण ही रक्कम अजून दिलेलं नाही. सरकारने ही मदत तातडीने दिली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा