ये बंद होगा वो बंद होगा म्हणत कांदा निर्यातबंदी ही नोटाबंदी सारखीच – छगन भुजबळ

बांगलादेश सीमेवर ५० हजार क्विंटल कांदा निर्यातीसाठी जात असतानाच निर्यातबंदी लादली गेली. नेहमीच्या स्टाइलमध्ये ये बंद होगा, वो बंद होगा असे सांगत एका रात्रीत कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचा आरोप करीत हा निर्णय नोटाबंदीसारखाच असल्याची टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी केली.

नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी केंद्र सरकारच्या निर्णयावर सडकून टीका केली. कांदा स्वस्त होतो तेव्हा फेकून द्यावा लागतो, त्यावेळी हमीभाव का देत नाहीत, असा सवाल भुजबळांनी यावेळी केला. देशाच्या धरसोड धोरणामुळे पाकिस्तान आणि इराणकडे मागणी वाढते, त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान होते असे सांगत भाजपच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकावा, असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या :-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.