Scuba Diving | स्कुबा डायव्हींगचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वोत्तम पर्याय

Scuba Diving | टीम महाराष्ट्र देशा: जानेवारी-फेब्रुवारीतील वातावरण फिरण्यासाठी (Travel) एकदम योग्य असते. या महिन्यांमध्ये वसंत ऋतू सुरू होतो. त्यामुळे या दिवसात वातावरण अतिशय अल्हाददायक असते. त्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी फेब्रुवारी महिना निवडतात. या दिवसांमध्ये लोक फिरायला जाण्यासोबतच अनेक ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करतात. यामध्ये लोक प्रामुख्याने स्कुबा डायव्हींगला प्राधान्य देतात. कारण आजकाल स्कूबा डायव्हिंगचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे तुम्ही पण स्कुबा डायव्हींगचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणी स्कुबा डायव्हींग करू शकतात.

गोवा

या आल्हाददायक वातावरणामध्ये तुम्ही स्कुबा डायव्हींग करायचा विचार करत असाल, तर गोवा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्याचबरोबर गोव्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात ‘गोवा कार्निव्हल’ आयोजित केला जातो. त्यामुळे या महिन्यात तुम्ही गोव्याला स्कुबा डायव्हींगसोबतच कार्निव्हल फेस्टिवलचा आनंद घेऊ शकतात.

तारकर्ली

तुम्ही जर मुंबई-पुण्याजवळ स्कुबा डायव्हींगचा पर्याय शोधत असाल, तर तारकर्ली तुमच्यासाठी योग्य ठिकाणी आहे. तारकर्ली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ आहे. तारकर्लीमध्ये तुम्ही अनेक ॲडवेंचर्स ॲक्टिव्हिटी करू शकतात. या ठिकाणी तुम्ही समुद्रकिनाऱ्यासोबत किल्ल्यालाही भेट देऊ शकतात.

अंदमान निकोबार बेट

अंदमान निकोबार हे पर्यटनासाठी सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. या ठिकाणाला देशासह परदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट द्यायला जातात. या ठिकाणी अनेक सुंदर बेटे आहे. अंदमान निकोबारमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांसोबत स्कूबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात.

नेत्राणी

स्कुबा डायविंग करण्यासाठी हे एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे. नेत्राणी हे ठिकाण मुर्डेश्वरपासून एक किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही स्कुबा डायव्हिंगसोबतच बोटिंग, फिशिंग इत्यादी गोष्टींचा आनंद घेऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.