InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जर मोदी पंतप्रधान नाही झाले तर?, भाजपने केली मोदींसाठी नवीन बंगल्याची सोय

- Advertisement -

बहुमताचा आकडा आम्ही सहज पार करू, असा सतत दावा भाजप करत असली तरी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याबाबत भाजप साशंक असल्याचे दिसते. नगरविकास मंत्रालयाने पंतप्रधान मोदींसाठी दिल्लीच्या लुटियन भागात बंगला शोधणे सुरू केले आहे. मोदींऐवजी अन्य कोणी नेता पंतप्रधान झाल्यास मोदींच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी ते केले जात आहे.

यासाठी मंत्रालयाकडून कृष्ण मेनन मार्गावरील व जनपथवरील बंगले देखील पाहिले जात आहेत. मोदी यांच्याखेरीज अन्य नेता पंतप्रधान झाला, तर मोदींना यापैकी एखादा बंगला त्यांच्या पसंतीनुसार दिला जाईल. त्यांनी मंजुरी दिलेल्या बंगल्याची नंतर दुरुस्ती केली जाईल वा त्यात आवश्यक ते बदल केले जातील. अर्थात, नवा नेता पंतप्रधान होईपर्यंत मोदी जनकल्याण मार्गावरील पंतप्रधानांसाठी असलेल्या निवासस्थानी राहतील.

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या –

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.