InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

राज ठाकरेंनी सांगितलेल्या हरिसालच्या ‘त्या’ तरूणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सांगितली दुसरी बाजू

डिजीटल गाव अशी ओळख असलेल्या हरिसालवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आपल्या सभेत व्हिडीओ दाखवत हरिसालमध्ये काहीच बदल झाले नसून, कुठलेच तंत्रज्ञान आले नसल्याचे दाखवले होते. जाहीरातीत दाखवलेल्या मुलाबदद्ल देखील ठाकरेंनी प्रश्न विचारले होते. आता याच हरिसालवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  उत्तर दिले आहे.

राज ठाकरे 4 वर्षांपूर्वी कधी हरिसालला गेले होते का?. आम्ही त्या मुलाला मॉडेल म्हणून घेतलं नाही. गावातील त्या मुलानेच तिथे गेलेल्या टीमला स्वत: गाव दाखवलं. गावात काय काय बदल झाले, परिवर्तन झालं हे त्या मुलानेच त्या टीमला दाखवलं. मी त्याचे व्हीडिओही तुम्हाला देऊ शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या  सभेतील मुद्दा खोडून काढला आहे.

हरिसालविषयी बोलताना, 4 वर्षांपूर्वीच हरिसाल वेगळं होतं आणि आज पाहाल तर हरिसाल वेगळं आहे. हरिसालमध्ये कुठलेही 4 जी टॉवर बसविण्यात आलेले नाही. ते गाव डिजीटल करण्यासाठी एक वेगळीच तंत्रप्रणाली वापरण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.