औरंगाबादमध्ये संतपीठ ते परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पाहा मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आज पुष्पचक्र अर्पण करुन मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मांना अभिवादन केलं. यावेळी भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक योजनांचा पाढा वाचून दाखवत एमआयएमला प्रत्युत्तर दिलं आहे.

पुढे यामध्ये ज्यामध्ये औरंगाबाद येथे संतपीठ स्थापन करण्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तसंच, निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं आहे. आम्हाला त्या शाळा नको आहेत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत. मराठवाड्यातल्या शाळांचं रुप अभिमान वाटला पाहिजे, असं करणार आहोत, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

परभणी वैद्यकीय महाविद्यालय आपण सुरू करतोय. संभाजीनगर आणि मराठवाडा एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. त्यामुळं शिर्डी आणि औरंगाबाद विमानसेवा सुरू करण्याचा मानस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला आहे. तसंच, घृष्णेश्वर मंदिराच्या सभामंडपाचे वेगळ्या प्रकारे बांधकाम करतोय. मंदिरे उघडा, त्यात जावेसे वाटले पाहिजे. मंदिरे स्वच्छ, सुंदर करणार आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा