InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

बघा रणवीर सिंग काय म्हणाला…

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबर रोजी सिंधी पद्धतीने लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेली ही जोडी सतत या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. त्यातच रणवीरने त्याला बाबा होण्याची इच्छा असल्याचं एका कार्यक्रमात सांगितलं.

रणवीरचं दीपिकावर किती प्रेम आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. रणवीरचं केवळ दीपिकावर प्रेमच नाहीये तर तो तिची काळजीही तितकीच घेतो. अलिकडेच रणवीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी बोलत असताना त्याने मला बाबा व्हायचं आहे असं सांगितलं. “माझी मनापासून बाबा होण्याची इच्छा आहे. मला माझ्या मुलांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करायचा आहे”, असं रणवीर यावेळी म्हणाला.

Loading...

- Advertisement -

 

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.