जमलं बघा! हर्षवर्धन पाटलांची लेक होणार बाळासाहेब ठाकरेंची नातसून

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आतापर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांनी ‘शिवतीर्थ’वर जाऊन भेट घेतली आहे. तर आज लेकीसह हर्षवर्धन पाटील यांनी राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’वर भेट घेतली.

मात्र ही भेट राजकीय नव्हती तर कन्या अंकिता पाटील यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी घेण्यात आली. अंकिता पाटील यांनी फेसबुकवरून राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत सुपुत्र बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांचा विवाह हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील हिच्यासोबत होणार आहे. अंकिता पाटील या सध्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. तर निहार बिंदुमाधव ठाकरे हे वकील आहेत. या विवाहाच्या निमित्तानं महाराष्ट्रात दोन राजकीय घराणे एकत्र येणार आहेत.

28 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये यांचा विवाह संपन्न होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज मनसे प्रमुख आणि निहार यांचे काका राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कोरोनाचा प्रभाव असल्यानं हा विवाह सोहळा जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अंकिता पाटील या सध्या राजकारणाबरोबरच सहकार क्षेत्रातही कार्यरत आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा