डोनाल्ड ट्रंप यांच्या महाभियोगच्या सुनावणी दरम्यान सिनेटर्सनी चक्क झोपा काढल्या !

राष्ट्राध्यक्ष ट्रंप आपल्या पदाचा गैरवापर करत असून त्यामुळे अमेरिकेच्या लोकशाही मूल्यांना धोका असल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात येत आहे.ट्रंप यांना पदच्युत करायचं की नाही याचा निर्णय हे सिनेटर्स घेणार आहेत. पण त्यांचं लक्ष सुनावणीकडे नव्हतं असं रॉयटर्सनं यांचं म्हणणं आहे. अमेरिकन संसदेचं वरिष्ठ सभागृह (सिनेट) हे लोकशाहीच्या दृष्टीने एक पवित्र ठिकाण मानलं जातं पण इथल्या सदस्यांनी महाभियोग सुनावणीदरम्यान एखाद्या खोडकर शाळकरी मुलासारखं वर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे.

… आणि कॅप्टन कोहलीला आठवेना ‘हि’ महत्त्वाची नावे  !

महाभियोगाची सुनावणी सुरू असताना सभागृहात शब्दकोडे, फिजेट स्पिनर्ससारखे गेम खेळण्यात आले, तसंच याठिकाणी एक कागदी विमानसुद्धा आढळून आलं आहे.लांबलचक सुनावणीदरम्यान डुलकी घेणाऱ्या सदस्यांमध्ये जिम रिच आणि जिम इनहोफ यांचा समावेश आहे.नियमानुसार महाभियोगाची सुनावणी होईपर्यंत सदस्यांनी आपल्या जागेवर बसून राहणं अपेक्षित असते मात्र तब्बल 9 डेमोक्रेटीक आणि 22 रिपब्लिकन सदस्यांनी आपल्या जागेवरून अनेकवेळा उठून या नियमाचे उल्लंघन केले आहे.

Loading...

…तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ ; ‘या’ बड्या नेत्याने केले विधान 

साधारणपणे सिनेट सभागृहातील इतर सत्रांना मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेट यांसारखी उपकरणे नेण्यास परवानगी असते, पण महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सभागृहात बंदी घालण्यात आली होती.नेमकं यामुळेच अनेकांना कंटाळवाणं वाटू लागलं होतं असे सूत्रांकडून कळते.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.