ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना भारत सरकारकडून पद्मश्री जाहीर

आपल्या सुरेल गायनाने अबालवृद्धांना वेड लावणारे जेष्ठ गायक सुरेश वाडकर यांना भारत सरकारकडून पदमश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या ३उच्च पद्म पुरस्कारांपैकी हा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे.

२० मीटरचं अंतर पार केलं तरी आपला देश बदलेल – सुबोध भावे

सुरेश वाडकरांनी  हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आतापर्यंत शेकडो गाणी गायली आहेत. २००७मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार बहाल केला होता.आजपर्यंत त्यांना अनेक हिंदी मंराठी गाण्यांसाठी पुरस्कार मिळाले आहेत.

Loading...

साईबाबा जन्मस्थळाचा वाद आता आणखी चिघळणार !

2011 मध्ये सुरेश वाडकरांना ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. लहानपणापासूनच गाण्याची आवड  असणाऱ्या वाडकरांचा जन्म कोल्हापुरात 7 ऑगस्ट 1955 रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी गुरु पंडित जियालाल वसंत यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे  धडे गिरवायला सुरु केले.सुरेश यांच्या पत्नी पद्माताई देखील शास्त्रीय गायिका आहेत.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.