खळबळजनक : ‘या’ बड्या नेत्याने केली राजकीय संन्यासाची घोषणा

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी अचानक संन्यास घेत असल्याची घोषणा केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मोदींचं भाषण ऐकताना मला गहिवरून आलं – अवधूत गुप्ते

हर्षवर्धन जाधव यांनी पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचं व्हिडीओत सांगितलं आहे. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले होते. राजकीय आणि कौटुंबिक कलहामुळे हर्षवर्धन जाधव चर्चेत होते. हर्षवर्धन जाधव केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावईदेखील आहेत.

Loading...

मोदींचं भाषण ऐकताना मला गहिवरून आलं – अवधूत गुप्ते

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं हर्षवर्धन जाधव यांनी निवृत्ती जाहीर करताना सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.