WHO चा गंभीर इशारा! तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात

नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत माहिती देत जागतिक आरोग्य संघटनेचे टेड्रोस अधनोम यांनी कोरोना व्हायरसची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात पोहोचली असल्याचे सांगितले आहे.

“डेल्टा व्हेरिअंट हा सध्या नसला तरी लवकरच जगातील सर्वात खतरनाक व्हेरिअंट बनेल. कारण हा कोरोना व्हायरस सतत विकसित होत आहे आणि आपले रुप बदलत आहे. यामुळे वेगाने संक्रमण पसरविणारे व्हेरिअंट जगभरात बनू लागले आहेत,” असं टेड्रोस अधनोम यांनी सांगितलं आहे.

पुढे ट्विटमध्ये टेड्रोस अधनोम म्हणाले, “लसीकरण सुरु झाल्यामुळे काही काळापुरते कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसली होती, मात्र आता पुन्हा हे रुग्ण वाढू लागले आहेत,” टेड्रोस अधनोम यांनी केलेल्या वक्तव्याने जगभराची चिंता वाढली आहे.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 41 हजार 806 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा