सेनादलने जिंकली तब्बल १ कोटी बक्षिस रक्कम असलेली कबड्डी स्पर्धा

एकाच महिन्यात दुसरी मोठी कबड्डी स्पर्धा जिंकत सेनादलने कबड्डीमधील आपली मक्तेदारी पुन्हा सिद्ध केली आहे. 

एकलव्य स्टेडियम,  हरियाणा येथे पार पडलेल्या पंडित दिन दयाल उपाध्याय मेमोरियल ऑल इंडिया नॅशनल स्टाईल कबड्डी चॅम्पियन्सशिप २०१८ स्पर्धेत सेनादलने भारतीय रेल्वे संघाचा ३७-३६ असा पराभव करत विजय संपादित केला. 

यावेळी सेनादलला १ कोटी, भारतीय रेल्वे संघाला ५० लाख, तिसऱ्या क्रमांकावरील हरियाणाला २५ लाख तर उत्तर प्रदेश संघाला ११ लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात आले. 

यावेळी केंद्रीय मंत्री विरेद्र सिंह, हरियाणा क्रीडा मंत्री अनिल विज, परिवहन मंत्री कृष्णलाल पंवार उपस्थित होते. 

भारतीय रेल्वे विरुद्ध सेनादल अनेक चढ-उतार पहायला मिळाले. यावेळी दोन्ही संघातील खेळाडूंनी विजेतेपदासाठी जोरदार प्रयत्न केले. 

सेनादलकडून मोनू गोयत आणि जयदीप यांनी चांगला खेळ करत आघाडी कमी होवू दिली नाही. 

जयदीप आणि महेंद्र यांनी दोन वेळा सुपर टॅकल केले तर परंतु शेवटचे १५ मिनीटे बाकी असताना भारतीय रेल्वेने जोरदार कमबॅक करत ३६ गुणांपर्यंत मजल मारली. अखेर त्यांना १ गुणाने पराभवाला सामोरे जावे लागले. 

सेनादलने याच महिन्यात मुंबई येथे झालेली फेडरेशन कप कबड्डी स्पर्धा जिंकली होती तर ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.