“दोन आठवड्यात आंदोलनावर तोडगा काढा”; सुप्रीम कोर्टाची सरकारला ताकीद

नवी दिल्ली : कृषी कायदा पस झाल्यानंतर गेले कित्येक महिने शेतकरी आंदोलन सुरु आहे. मात्र अद्याप सरकारने यावर कोणताही तोडगा काढलेला नाही. यानंतर आता सर्वोच न्यायालयाने केंद्रसरकारला फटकारले आहे. सध्या दिल्ली उत्तर प्रदेश सीमेवर कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे वाहतूक कोंडी होत आहे. यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.
पुढे दोन आठवड्यांची मुदत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिली. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान वाहतूक कोंडीवरून केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले आहे. अशा पद्धतीने वाहतूक कोंडी केली जाऊ शकत नाही, यासाठी सरकारला तोडगा काढावा लागेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारला बराच वेळ दिला आहे त्यावर तोडगा काढावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
या आंदोलनामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र अशाप्रकारे वाहतुक कोंडी करू शकत नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यावर केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारने दोन आठवड्यात तोडगा काढावा, अशी ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. सरकारला आतापर्यंत बराच वेळ मिळाला असून यावर समाधान शोधावे.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारने एकमेकांना सहयोग करावा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. या प्रकरणी पुढील सुनावणी २० सप्टेंबरला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मी असतो तर कानाखाली चढवली असती’, मुख्यमंत्र्यांवर बोलताना राणेंची जीभ घसरली
- ठाकरे सरकारला सत्तेच्या लालसेपोटी हिंदू सणांचा विसर पडलाय : प्रवीण दरेकर
- हिंदूविरोधी ठाकरे सरकारची आता या हंडी फोडण्याची वेळ आलीये : अतुल भातखळकर
- तालिबानचं बलाढ्य अमेरिकेला दिलं आव्हान; ३१ ऑगस्टपर्यंत तारखेपर्यंत सैन्य मागे घ्या नाहीतर…
- प्रत्येकवेळी संयमाची सबुरीची भाषा हिंदू बांधवांनाच का सांगायची?,दहीहंडीला परवानगी नाकारल्याने राम कदम आक्रमक