लहानपणी डॉक्टरनं केलं लैंगिक शोषण; नीना गुप्ता यांचा गौप्यस्फोट  

मुंबई : बॉलीवूडमधील जेष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांची वाहवा मिळवताना दिसतात.

काही महिन्यांपूर्वी त्यांचे ‘सच कहू तो’ नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले होते. यातून नीना यांनी अनेक खुलासे केले होते. यात आता नीना यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

लहानपणी आपल्याला लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागल्याचे त्यांनी सांगितलं आहे. ते शोषण दुसरं कुणी नव्हे तर डॉक्टरांनी केले होते. असा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. नीनानं आपल्या आईच्या भीतीमुळे ही गोष्ट कुणाला सांगितली नव्हती. नीनाला असं वाटतं की, तिच्यासोबत जे काही झालं त्यासाठी आपल्याच दोषी ठरवलं जाईल, असं त्यांना वाटल्यानं त्यांनी ती गोष्ट कुणालाही सांगितली नव्हती. आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

नीना जेव्हा शाळेत होत्या तेव्हा एकदा डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेल्या होत्या. त्यांचा भाऊ वेटिंग रुममध्ये थांबला. त्या डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टरनं त्यांना तपासायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं. त्याचा आणि त्या तपासणीशी काही एक संबंध नव्हता. नीना यांना काही वेगळं होतंय याची जाणीव झाली तेव्हा त्या कमालीच्या घाबरुन गेल्या. मात्र त्या गोष्टीविषयी त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं. हा प्रकार झाल्यानंतर त्या काही दिवस नैराश्यात होत्या. घरातील एका कोपऱ्यात बसून रडत असल्याची आठवण त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा