शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरो अर्थान एनसीबीनं अटक केली आहे. त्याला नक्की कोणत्या कारणासाठी अटक करण्यात आली याची माहिती एनसीबीनं दिली आहे. आर्यनच्या अरेस्ट मेमोमध्ये याचा संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेतल्यानंतर आता सोशल मीडियावर शाहरुखचा एका जुन्या मुलाखतीमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये शाहरुखन मुलगा आर्यन खान विषयी बोलताना म्हणाला होता की, “माझ्या मुलाने ती सगळी वाईट काम करावीत जी मी माझ्या तरुणपणी करु शकलो नाही.” ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

1997 मध्ये शाहरुख आणि गौरीने सीमा अग्रवालच्या टाॅक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी शाहरुखनं आपल्या मुलासाठी एक वक्तव्य केलं. त्यानुसार त्याच्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्स घ्यावेत अशी माझी इच्छा असल्याचं शाहरुखनं म्हटलं होतं. सध्या एनसीबीनं आर्यनला ताब्यात घेतल्यामुळे शाहरुखचं हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्वाच्या बातम्या

 

 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा