शाहरुख खानने सांगितला आपल्या मुलांचा खरा धर्म,वाचून व्हाल थक्क !

शाहरुख खान याला कोण नाही ओळखत. बॉलिवूडचा किंग म्हणून ओळखला जाणारा हा खान लाखो लोकांच्या हृदयाची धडकन आहे.फक्त भारतातच नाही तर जगभरात त्याचे अनेक चाहते आहेत.त्याच्या चित्रपटांमुळे, त्याच्या IPL च्या टीममुळे किंवा इतर काही कारणांसाठी शाहरुख कायम लाइमलाईट मध्ये असतो.

अत्यअल्प मदतीमुळे शेतकऱ्यांची अपघात विम्याकडे पाठ

सध्या टीव्हीवर चालू असणाऱ्या एका डान्स रियालिटी शोमध्ये याने हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या घरी घडलेला एक किस्सा सर्वांसोबत शेअर केला तो असं म्हणाला कि , “एकदा सुहाना लहान असताना तिला एक फॉर्म भरायचा होता. यात तिला तिचा धर्म कोणता ही लिहायचं होतं. त्यामुळे तिने ‘पप्पा, आपण कोणत्या धर्माचे आहोत? ‘असा प्रश्न विचारला. त्यावेळी ‘आपण भारतीय आहोत. कोणताही धर्म नसतो आणि तो नसायलाही पाहिजे”, असं उत्तर शाहरुखने सुहानाला दिलं. ही आठवण शेअर करत त्याने मी मुसलमान, माझी पत्नी हिंदू आणि आमच्या मुलांचा धर्म हा भारतीय आहे असं सांगितले.

Loading...

…तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ ; ‘या’ बड्या नेत्याने केले विधान 

त्याच्या या उत्तराने पुन्हा एकदा सर्वांचे हृदय जिंकले. त्याच्या या वक्त्यव्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाचा हॅशटॅग्सचा ट्रेंड सुरु झाला आहे. आणि सगळीकडे सध्या त्याचीच चर्चा चालू आहे. झिरो या चित्रपटानंतर शाहरुखचा एकही चित्रपट आलं नाही. झिरो या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसावर हवी तेवढी कमाई केली नाही. सध्या त्याचे चाहते त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.