शाहरुखचा मुलगा ड्रग्स प्रकरणात तुरूंगात तरीही…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित ड्रग्स प्रकरणात तुरूंगात आहे. अशातच आता शाहरूख खानला दिलासा देणारा एक अहवाल आता समोर आला आहे.

आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकल्यानं अनेक कंपन्यांनी शाहरुखच्या जाहिराती ब्लाॅक केल्या होत्या. त्यामुळे येत्या काळात शाहरुखची लोकप्रियता घटेल, अशी शक्यता होती. मात्र, या प्रकरणामुळे शाहरूखची लोकप्रियता घटली नसल्याचा अहवाल उद्योग क्षेत्रातून समोर आला आहे.

शाहरूख हा लोकप्रिय ब्रँडपैकी एक आहे. ड्रग्स प्रकरणात शाहरूखची लोकप्रियता कमी झाली नाही. तो आता पुन्हा जाहिरातींमध्ये दिसून येतोय, असं उद्योग जाहिरात तज्ज्ञांनी म्हटलं आहे. नुकतीच शाहरूखने डिझनी प्लस हाॅटस्टारची आणि भारत पाकिस्तान सामन्याची जाहिरात केली होती.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा