Shahaji Bapu Patil | “महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट”; शहाजी बापू पाटील राऊतांवर बरसले

Shahaji Bapu Patil | मंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या (Sanjay Raut) वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे.

खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. या घडामोडीनंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांवर खोचक टीका केली आहे. संजय राऊत हे आगलावे आहेत. ते टेंभा घेऊन महाराष्ट्रात आग लावत फिरतात, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

Shahaji Bapu Patil Comment on Sanjay Raut’s Statement

“संजय राऊत हे आगलावे आहेत. महाराष्ट्रात टेंभा घेऊन आग लावत हिंडणारं हे एक कार्ट आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नका.” अशा शब्दांत शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे.

“ते काळू बाळू आहेत” (Shahaji Bapu Patil criticize on Sanjay raut and Sunil Raut)

ठाकरे गटाचे आमदार आणि संजय राऊत यांचे धाकटे बंधू सुनील राऊत यांनी संजय राऊतांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. याबाबत बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, “एकाच आई-बापाची दोन पोरं सारखीच आसतात. ते काळू बाळू आहेत.”

महत्वाच्या बातम्या-

You might also like

Comments are closed.