Shahaji Bapu Patil | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केला आहे. ‘श्रीकांत शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर याला सुपारी दिली’, असा आरोप राऊतांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनीही संजय राऊतांवर टीका केली आहे.
Shahaji Bapu Patil Comment On Sanjay Raut
“खरं तर, या संजय राऊतांचं आडनाव बदलून नामकरण करून संजय आगलावे असं त्यांचं नाव ठेवायला हवं. ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. एक निष्पाप, प्रामाणिकपणे चांगलं काम करणारं तरुण तडफदार नेतृत्व श्रीकांत शिंदेंचं आहे. अशा तरुण नेतृत्वावर असे घाणेरडे आरोप करणं संजय राऊतांनाच काय, कुणालाच शोभत नाहीत. पण बेभान झालेले संजय रऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम राहिलेला नाही.”, असे शहाजी बापू पाटील म्हणाले आहेत.
“राऊतांनी मातोश्रीचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी उचलली”
‘संजय राऊतांनी माझ्यासमोर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती’ या रामदास कदमांच्या वक्तव्यावर बोलताना शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊतांना टीकेचे लक्ष्य केल्याचे पहायला मिळालं आहे. “संजय राऊत हे मातोश्रीशी कधीच एकनिष्ठ आहेत, असं मला वाटलं नाही. त्यांनी मातोश्रीचं राजकारण उद्ध्वस्त करण्याचीच सुपारी उचलली आहे. तसेच रामदास कदम यांच्याकडे निश्चित पुरावे असल्याशिवाय असा आरोप ते करणार नाहीत. ते एक जबाबदार नेते आहेत.”, असेही शहाजी बापू म्हणाले आहेत.
“राऊतांसारख्या व्यक्तीने असे आरोप करणं चुकीचं”
“संजय राऊत खासदार आहेत. त्यांच्या सारख्या व्यक्तीने दोन हजार कोटींचे डील झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. केंद्रीय निवडणूक आयोग स्वायत्त संस्था आहे. या देशात केंद्रीय निवडणूक आयोगामुळे लोकशाही टिकून आहे. निवडणूक आयोगासारख्या संस्थांवर टीका करुन संजय राऊत जनसामान्यात लोकशाही विषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हणाले आहेत.
शहाजी बापू पाटलांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर (Sanjay Raut Replied To Shahaji Bapu Patil)
“हा कोण शहाजी? हा काय खरा शहाजी आहे का? याने शहाजी नाव बदललं पाहिजे. नाहीत तर भोसले घराण्याचा अपमान होतोय सारखा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Sharad Pawar | “मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील…”; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया
- Chandrashekhar Bawankule | “शरद पवारांना फक्त मुस्लिमांची मतं पाहिजेत?”; बावनकुळेंचा संतप्त सवाल
- Sanjay Raut | “कोण शहाजी?, भोसले घराण्याचा अपमान होतोय”; राऊतांची शहाजीबापूंवर जहरी टीका
- Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल
- Sanjay Raut | “नारायण राणेंना तर बाईनं पाडलंय”; अजितदादांच्या या वक्तव्यावर राऊतांची स्तुतीसुमनं