Shahajibapu Patil | “गुवाहाटीमुळेच सेलिब्रिटी झालो, आता दरवर्षी…”, शहाजीबापू पाटील झाले भावूक

Shahajibapu Patil | मुंबई :  काय ती झाडी, काय ते डोंगर, डायलाॅगमुळे प्रसिद्ध झालेले नेते शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) गुवाहाटी (Guwhati) दौऱ्यावर भावूक झाले. कामाख्या देवी चं दर्शन घेण्यासाठी हे आमदार गुवाहाटीला जाणार आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यादरम्यान, आम्ही उद्या गुवाहाटीला जाणार आहोत. निश्चितपणाने पुन्हा गुवाहाटीच्या आठवणी ताज्या होणार आहेत. भाव भावनांचे विश्व कळत नकळत हलके होणार आहे. खास करून माझ्या संवादाने मला प्रसिद्धी मिळाली आणि जनतेने केलेले माझ्या माणदेशी भाषेचे कौतुक यामुळे कामाख्या देवीच्या दर्शनाला गेल्यावर माझ्या डोळ्यातून अश्रू येणार असल्याचं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुवाहाटीमुळे मी सेलिब्रिटी झालो हे वास्तव आहे. मी आता पत्नीसह दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प गुवाहाटीला गेल्यावर करणार आहे, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, गुवाहाटीत कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी हे सर्व आमदार जाणार आहेत. या माध्यमातून आमदारांशी संवाद साधण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.