Shahajibapu Patil | “संजय राऊत नारादमुनी, तरुंगातून सुद्धा…”, शहाजीबापू पुन्हा बरसले

Shahajibapu Patil | मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजप (BJP) पक्षाने माघार घेतली आहे. यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी भाजप पक्षाचं कौतुक केलं आहे तर विरोधकांनी भाजप पक्षाने घाबरुन माघार घेतली असल्याचा दावा केला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हे सगळं स्क्रीप्टेड असल्याचं म्हटलं आहे. यावर एकनाथ शिंदे गटाचे म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने जो निर्णय घेतला त्यातून राज्याची संस्कृती पुढे येताना दिसत आहे. राजसाहेबांच्या पत्राची दखल फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही केली, असं म्हणत संजय राऊत हे नारद मुनीचे पात्र आहे. तुरुंगातूनही काडी पेटवत आहेत, असा घणाघात शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीवर सुद्धा शहाजीबापूंनी वक्तव्य केलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जात आहे. त्यामुळे आमच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच शहाजीबापू पाटलांनी विनायक राऊत आणि संजय राऊत यांच्यावर घणाघात केला होता. विनायक राऊत यांना पाडण्यासाठी निलेश राणे यांनी पुढे यावं, 2024 ला आपण मैदानात उतरू असं शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं होतं. तसेच नारायण राणे यांच्या जीवनातील संघर्ष, निलेश राणे तुमच्याही जीवनात आणि माझ्याही जीवनात आला नसल्याचं वक्तव्य शहाजीबापू पाटील यांनी केलं. संघर्षाचं दुसरं नाव म्हणजे, नारायण राणे, एकनाथ शिंदे. एकेकाळी स. का. पाटील हे नाव राजकारणात खूप मोठं होतं. त्याच स.का. पाटलांची सभा जर कोणी उधळली असेल तर त्याचं नाव आहे नारायण राणे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ कोकणात रोवली आणि भगवा झेंडा संपूर्ण कोकणात फिरवला. नारायण राणेंना स्वतःचा जीव धोक्यात घालूनसुद्धा अनेक वेळा हे काम करावं लागलं, अस देखील शहाजीबापू म्हणाले होते.

आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, यामध्ये शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. त्याचबरोबर, या दोघांसोबतच अजूनही दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत अशी टीका सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली होती. यावेळी बोलताना शहाजी बापू पाटील यांनी थेट शिवसेना खासदार संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “या दोन राऊतांनी आमचं वाटोळं केलं, असं शहाजीबापू म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.